क्रिकेटविश्वात शोककळा! माजी भारतीय फिरकीपटू दिलीप दोषी यांचे हृदयविकाराने निधन

सोमवार रात्री भारतीय क्रिकेटसाठी एक दुखद घटना घडलेली आहे. माजी भारतीय फिरकीपटू दिलीप दोषी यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी 23 जून रोजी लंडनमध्ये शेवटचा श्वास घेतला. भारतीय संघ (Indian cricket team) सुद्धा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या मालिकेबद्दल काही काळ आधीच दिलीप दोषी यांनी बातचीत केली होती, दिलीप जोशी यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 33 कसोटी सामने आणि 15 वनडे सामने खेळले होते.

दिलीप दोषी (Dilip Doshi) यांनी 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, जिथे ते 1979 मध्ये देशासाठी पहिल्यांदा खेळले होते. 1983 मध्ये त्यांच्या करिअरचा शेवट झाला. त्यांनी 33 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 6 वेळा 5 विकेट्स घेऊन 114 विकेट्स घेतलेल्या होत्या. याशिवाय 15 वनडे सामन्यांमध्ये 3.96 च्या शानदार सरासरीने 22 विकेट्स घेतल्या होत्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुद्धा दोषी यांनी सौराष्ट्र आणि बंगालसाठी क्रिकेट खेळले आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये ते बर्कशायर आणि नॉटीघमशायर संघाचा भाग राहिलेले होते. दिलीप दोषी यांची आत्मकथा खूप प्रसिद्ध आहे, ज्याचं नाव स्पिन पंच आहे.

खेळाडू सोबत ते दिलीप दोषी एक यशस्वी कॉमेंटर सुद्धा होते. निवृत्तीनंतर त्यांनी कॉमेंट्री मध्ये सुद्धा खूप यश संपादन केल होतं.‌

Comments are closed.