भारताविरुद्ध अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, स्टार खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
न्यूझीलंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले आहे. आता अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड रविवारी 9 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. न्यूझीलंडने उपांत्यफेरी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. पण आता संघाला अंतिम सामन्यापूर्वी मोठा झटका बसू शकतो. एका रिपोर्टच्या अंदाजानुसार न्यूझीलंडचा घातक खेळाडू मैट हेनरी दुखापती झाला आहे. तो भारताविरुद्ध अंतिम सामन्यात खेळणार की नाही यात शंकाच आहे.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये लाहोर येथे बुधवारी उपांत्य फेरीतील सामना खेळला गेला. या सामन्यात 29 व्या षटकादरम्यान हेनरी दुखापती झाला. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हेनरीक क्लासेनचा कॅच पकडताना त्याला दुखापत झाली. त्याने कॅच तर पकडला पण, त्याच्या उजव्या खांद्याला जबरदस्त मार लागला. त्यावेळी हेनरी मैदानातून बाहेर पडला.
मैट हेनरी भारतीय संघाविरुद्ध अंतिम सामना खेळेल की नाही, याविषयी अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही. मैट हेनरीने उपांत्य फेरी सामन्यात 7 षटके गोलंदाजी केली. त्याने त्यादरम्यान 43 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. तसेच तो जेव्हा मैदानातून बाहेर गेला त्यानंतर काही वेळाने तो मैदानात परतही आला. त्यानंतरही त्याने 2 षटके गोलंदाजी केली.
न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिला साखळी सामना पाकिस्तान विरुद्ध खेळून त्यामध्ये विजय मिळवला होता. पाकिस्तानला न्यूझीलंडने 60 धावांनी पराभूत केले होते. न्यूझीलंडने दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध खेळला. जो की त्यांनी 5 विकेट्स ने जिंकला. पण न्यूझीलंडला भारतीय संघाने पराभूत केले. भारतीय संघाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. त्यानंतर न्युझीलंड संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवले. आता न्यूझीलंड आणि भारतीय संघ अंतिम सामन्यात समोरासमोर येतील.
हेही वाचा
SA vs NZ: दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले, टेम्बा बावुमाने पराभवाबाबत केला मोठा खुलासा
दुबईमध्ये फाइनल पाहण्यासाठी जाणार आहात? जाणून घ्या तिकीट दर आणि प्रवासाची संपूर्ण माहिती
आजही तोच क्लास! पन्नाशी पार केलेल्या सचिनने वेळ उलटवली, 34 चेंडूत तडाखेबंद 64 धावा!
Comments are closed.