Asia Cup: आशिया कप 2025 स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल का करण्यात आला? मोठं कारण समोर!

आशिया कप 2025 (Asia Cup) यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी सगळ्या संघांनी तयारी सुरू केली आहे. स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरला होईल आणि अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळला जाईल. पण या आधीच वेळापत्रकामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. स्पर्धेतील 18 सामन्यांच्या वेळेत बदल झाला आहे आणि त्यामागचं मोठं कारणही समोर आलं आहे.

स्पर्धमधील 19 पैकी 18 सामने आता गल्फ स्टँडर्ड वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील. आधी हे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 ला सुरू होणार होते. म्हणजेच आता सामने अर्धा तास उशिरा सुरू होतील.

यामागचं कारण म्हणजे सप्टेंबरमध्ये खाडी देशांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं. प्रचंड उकाड्यामुळे सामना खेळणं आणि पाहणं कठीण होतं. त्यामुळे सर्व क्रिकेट बोर्डांनी ब्रॉडकास्टर्सना सामन्यांचा वेळ पुढे ढकलण्याची विनंती केली होती आणि त्याला मान्यता मिळाली आहे.

स्पर्धेमध्ये एकूण 19 सामने खेळले जातील. त्यातील 15 सप्टेंबरला यूएई विरुद्ध ओमान हा सामना मात्र जुन्याच वेळेला होणार आहे.

Comments are closed.