IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत कोणता खेळाडू बाहेर जाणार? अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत सध्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे, त्यामुळे हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी (Team india) अत्यंत महत्त्वाचं आहे.

या सामन्यापूर्वी भारताच्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाली आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep singh), आकाशदीप (Aakash Deep & Nitish Kumar Reddy) आणि अष्टपैलू नितीश रेड्डी हे सर्व खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे जवळपास निश्चित आहे.

भारतासाठी सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मँचेस्टरसारख्या खेळपट्टीवर ते 4 वेगवान गोलंदाज घेणार का, की दोन फिरकीपटूंना संधी देणार?

मँचेस्टरची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. त्यामुळे भारत चार पेसर घेण्याचा विचार करू शकतो. आकाशदीप बाहेर झाल्यामुळे त्याच्या जागी युवा गोलंदाज अंशुल कंबोजला (Anshul Kamboj) संघात स्थान मिळू शकते. त्याला अर्शदीप आणि आकाशदीप यांच्या जागी स्क्वॉडमध्ये घेतलं गेलं आहे.

जर भारत दोन फिरकीपटूंना खेळवायचा विचार करेल, तर रविंद्र जडेजासोबत कुलदीप यादवलाही खेळवलं जाऊ शकतं. पण जर एकच स्पिनर खेळवला गेला, तर नितीश रेड्डीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते.

रिषभ पंतच्या (Rishbh Pant) बोटाला मागील सामन्यात दुखापत झाली होती. अद्याप तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यानं, चौथ्या कसोटी सामन्यात तो फक्त फलंदाज म्हणून खेळेल, अशी शक्यता आहे. अशा वेळी विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलला (Dhruv jurel) संघात घेतलं जाऊ शकतं.

चौथ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: के. एल. राहुल, यशस्वी जयस्वाल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव / शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज

Comments are closed.