आरसीबीसाठी ही जोडी करणार ओपनिंग? RCB च्या संघात दमदार बदल!
आगामी इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या 18 व्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल मधील सर्व 10 संघ स्पर्धेच्या तयारीमध्ये आहेत. हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये कोलकत्ताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जाणून घ्या की, पहिल्या सामन्यासाठी आरसीबीची प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे.
बंगळुरू संघ या हंगामात खूप मजबूत पद्धतीने मैदानावर उतरणार आहे. खूप वर्षानंतर आरसीबी संघ खूप मजबूत दिसत आहे. संघाकडे टी20 मधील खूप शानदार खेळाडू आहेत. याशिवाय संघाकडे वेगवान गोलंदाजीचा विभाग सुद्धा यावेळेस खूप तगडा दिसत आहे. तसेच संघामध्ये काही अष्टपैलू खेळाडू सुद्धा सामील आहेत.
प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास, किंग कोहली आणि इंग्लंडचा शानदार यष्टिरक्षक फलंदाज फिल साल्ट हे दोघे डावाची सुरुवात करताना दिसतील. यानंतर रजत पाटीदार तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येईल. चौथ्या क्रमांकावर जितेश शर्मा खेळू शकतो. त्याला टी20 मधील स्पेशालिस्ट फलंदाज म्हटले जाते. जितेश वेगाने धावा करण्यात माहीर आहे.
तसेच फिनिशरचा रोलसाठी यावेळेस आरसीबीमध्ये काही दमदार खेळाडू आहेत. 5 नंबर वर टीम डेविड आणि 6 व्या क्रमांकावर लियाम लिविंगस्टोन खेळण्यासाठी तयार असतील. या दोघांची साथ देण्यासाठी 7 व्या क्रमांकावर कृणाल पांड्या सुद्धा उपस्थित असणार आहे. याप्रकारे या हंगामात आरसीबीकडे एका नंबर पासून ते सात नंबर पर्यंत मजबूत असे फलंदाज आहेत.
गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास, वेगवान गोलंदाजी विभाग सुद्धा खूप मजबूत दिसत आहे. भुवनेश्वर कुमारची साथ देण्यासाठी रसिक दार सलाम, यश दयाल, जोश हेजलवूड तसेच रोमारिओ शेफर्ड आहे. फिरकीबद्दल बोलायचे झाल्यास, सुयश शर्मा आहे, त्याची साथ देण्यासाठी कृणाल आणि लिविंग स्टोन सुद्धा फिरकी विभागांमध्ये महत्त्वाची कामगिरी करू शकतात.
आरसीबी संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:-
फिल सलत, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्नाधर), जितेश शर्मा (यशक्रक्ष) संघ डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रुनल पांड्या, जोश हेजलवुड, रोमरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, रासीख दर सलाम, याश दैलालम
Comments are closed.