दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठे फेरबदल होणार? अक्षर पटेलऐवजी 'हा' स्टार खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

आयपीएल 2026 साठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सज्ज झाला आहे. अलीकडेच झालेल्या लिलावात दिल्लीने अनेक स्टार खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. गेल्या हंगामात (2025) दिल्लीची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. अक्षर पटेलच्या (Axar Patel) नेतृत्वाखाली संघाने खेळ केला होता, पण त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स (Delhi आपला कर्णधार बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आगामी हंगामासाठी केएल राहुलला (KL Rahul) कर्णधार बनवण्याच्या तयारीत आहे. आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर राहिला होता आणि टॉप-4 मध्ये जागा मिळवू शकला नव्हता. 14 सामन्यांपैकी 7 सामन्यांत त्यांना विजय मिळाला, तर 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. केएल राहुलकडे आयपीएलमध्ये नेतृत्व सांभाळण्याचा चांगला अनुभव असल्याने फ्रँचायझीने त्याच्या नावाचा विचार केला आहे.

केएल राहुलने यापूर्वी पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले आहे. त्याने एकूण 64 सामन्यांत कर्णधारपद सांभाळले असून, त्यापैकी 32 सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे, तर 30 सामन्यांत पराभव झाला आहे. 2 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

आयपीएल 2026 साठी दिल्ली कॅपिटल्सचा पूर्ण संघ: राहुल, मिचेल स्टार्क, अक्षर पटेल, केएल राहुल, करुण नायर, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, नितीश राणा, बेन डकेट, डेव्हिड मिलर, पथुम निस्संका, पृथ्वी शॉ, अजय मंडल, मिचेल स्टार्क, टी नटराजन, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, काइल जॅमिसन, विप्रज निगम, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, औकिब डार, साहिल पारख.

Comments are closed.