मोठा फ्रॉड टळला! विराट कोहलीच्या नावाचा वापर करून अश्विनला फसवण्याचा प्रयत्न, क्रिकेटपटूने सांगितला धक्कादायक अनुभव
रविचंद्रन अश्विन विधान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारचा नंबर काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील एका मुलाला मिळाला. त्यानंतर त्याच्याकडे विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या स्टार खेळाडूंचे फोन आले. मात्र, नंतर रजत पाटीदारने पोलिसांच्या मदतीने आपला नंबर परत मिळवला. ही घटना ऐकल्यानंतर, भारतीय स्टार क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने त्याचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे, जेव्हा विराट कोहलीच्या नावावर त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला होता. (Ravichandran Ashwin scam attempt)
आयपीएल 2025 मध्ये रविचंद्रन अश्विन चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. हंगाम संपल्यानंतर एका व्यक्तीने डेव्हॉन कॉनवे असल्याचे भासवून त्याच्यासोबत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, “आयपीएल संपल्यानंतर एका व्यक्तीने डेव्हॉन कॉनवे असल्याचे सांगत मला मेसेज केला, ‘हाय दोस्त, कसा आहेस?’ मीही उत्तर दिले, ‘आपण संपर्कात राहू. तू एमएलसीमध्ये खेळत आहेस; मी मॅच बघेन.’ मग त्याने विचारले, ‘मी विराट कोहलीचा नंबर गमावला आहे, तू मला शेअर करू शकतोस का?’ मला वाटले की तो विराटचा नंबर का मागतोय? मला शंका आली, पण डेव्हॉन कॉनवेला गैरसमज होऊ नये म्हणून मी त्याला काही विचारले नाही. मग मी विराट कोहलीचे एक वेगळे कार्ड काढून त्याला एक वेगळा नंबर दिला.” (Virat Kohli phone number fraud)
या घटनेतून स्टार रविचंद्रन अश्विन थोडक्यात बचावला. याबद्दल पुढे अश्विन म्हणाला, “जेव्हा मी तो नंबर शेअर केला, तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘मी आणखी काही नंबर गमावले आहेत.’ मी ‘कोणाचे?’ असे विचारल्यावर त्याने ‘रोहित शर्मा आणि एमएस धोनी’ असे उत्तर दिले. माझी शंका वाढली आणि मला वाटले की कोणीतरी चेष्टा करत आहे. मग मी त्याला एक प्रश्न विचारला, ‘मी तुला या वर्षी एक बॅट दिली होती, ती बॅट कशी आहे?’ त्यावर तो म्हणाला की, ती बॅट खूप चांगली आहे. पण मी त्याला कोणतीही बॅट दिली नव्हती. त्याने खोटे सांगितले, आणि मी लगेच त्याला ब्लॉक केले.” (Ravichandran Ashwin YouTube channel)
पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, “त्या व्यक्तीने संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. मी सीएसके ग्रुपमध्ये जाऊन डेव्हॉन कॉनवेचा नंबर तपासला, आणि तो त्याचा नंबर नव्हता. सुदैवाने, माझ्यामध्ये एवढी तरी समजदारी होती की मी विराटचे डुप्लिकेट कार्ड पाठवले. तो त्याचा ऑस्ट्रेलियाचा व्हॉट्सॲप नंबर होता. सगळ्यांचे नंबर मागत असल्यामुळे मी सुखरूप बचावलो.” (Ravichandran Ashwin personal story)
Comments are closed.