श्रेयस अय्यरबाबत आनंदाची बाब समोर! दुखापतीवर बीसीसीआयने दिली नवी अपडेट
टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या (Team india’s star player Shreyas iyer) दुखापतीबाबत बीसीसीआयकडून मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितलं आहे की, अय्यरची तब्येत आता पूर्वीपेक्षा खूप सुधारली आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे.
28 ऑक्टोबर रोजी अय्यरची पुन्हा एकदा स्कॅन तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याच्या दुखापतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.
बीसीसीआयची मेडिकल टीम सिडनीतील डॉक्टरांशी सतत संपर्कात आहे आणि अय्यरच्या आरोग्याबद्दल वेळोवेळी माहिती घेत आहे. श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅच घेताना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं.
बोर्डाने पुढे सांगितले की, अय्यरला आता पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. 28 ऑक्टोबरला करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये त्याच्या दुखापतीत मोठी सुधारणा दिसली आहे. तरीसुद्धा, तो काही दिवस रुग्णालयातच राहील, पण त्याची रिकव्हरी फेज सुरू झाली आहे.
अंतर्गत रक्तस्राव झाल्यानंतर अय्यरला त्वरीत आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं.
त्यानंतर देशभरातील क्रिकेटप्रेमी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंतेत होते आणि त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र, अय्यर पूर्णपणे फिट होण्यासाठी किती वेळ लागेल, हे सध्या सांगणं कठीण आहे.
Comments are closed.