आयसीसीचा मोठा निर्णय! भारत-पाक सामन्यात 'ही' व्यक्ती असणार मैदानाबाहेर?

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 मधील महामुकाबला (14 सप्टेंबर) रोजी खेळला गेला होता. भारताने जबरदस्त खेळ करत 7 विकेटने विजय मिळवला आणि पाकिस्तानला धूळ चारली होती. सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांच्याशी हस्तांदोलन केले नव्हते. हस्तांदोलन न करण्याचा संदेश पाकिस्तानी संघापर्यंत पोहोचवण्याचे काम सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी केले होते. त्यांनीच सांगितले होते की भारतीय संघाला पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करायचे नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे सामनाधिकारी बदलण्याची मागणी केली होती. आता 21 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-4 मध्ये सामना होणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी आयसीसी अँडी पायक्रॉफ्ट यांनाच रेफरी म्हणून नेमणार का? चला जाणून घेऊया.

भारतीय संघातील खेळाडूंनी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या मार्फतच पाकिस्तानी संघापर्यंत हस्तांदोलन न करण्याचा संदेश पोहोचवला होता. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर भडकला होता आणि त्यांना आशिया कपमधून हटवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली होती. यापूर्वीही पाकिस्तानने यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती, पण त्यावेळी आयसीसीकडे पायक्रॉफ्ट यांच्याव्यतिरिक्त दुबईत दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता, कारण आशिया कप 2025 साठी निवडलेले सर रिचर्ड रिचर्डसन हे अबू धाबीमध्ये होते. आशिया कप 2025 साठी आयसीसीने अँडी पायक्रॉफ्ट आणि सर रिचर्ड रिचर्डसन यांची सामनाधिकारी म्हणून निवड केली आहे. अशा परिस्थितीत 21 सप्टेंबरला पाकिस्तानच्या जोरदार विरोधानंतर आयसीसी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पायक्रॉफ्ट यांच्या ऐवजी सर रिचर्ड रिचर्डसन यांना रेफरी म्हणून नेमू शकतात.

आशिया कप 2025 दरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडू रमीज राजाने प्रायक्रॉफ्ट यांच्यावर आरोप केले होते आणि त्यांना फिक्सरपर्यंत म्हटले होते. आपल्या विधानात रमीज यांनी सांगितले होते की प्रायक्रॉफ्ट भारतासाठी 91 सामन्यांमध्ये रेफरीची भूमिका निभावले आहेत. ते फार मोठे फिक्सर आहेत. असो, 21 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येण्यासाठी सज्ज आहेत. या सामन्यासाठी आयसीसी कोणाला रेफरी म्हणून नेमते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Comments are closed.