पुणेकरांसाठी मोठी बातमी! या 6 मार्गांवर आता रात्रीही बसेस धावणार, पीएमपीच्या रात्रीच्या बससेवेचा फायदा कोणाला?

पुणे : शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात रात्रीचा प्रवास करणे म्हणजे खिशाला त्रासदायक ठरत आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना रात्री घरी जाताना खिसा रिकामा करावा लागतो. कारण नागरिकांना रात्री घरी जाण्यासाठी महागडी कॅब सेवा घ्यावी लागते.
रात्री कॅब सेवा शुल्क जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रात्रीच्या शिफ्टनंतर घरी जाणे कठीण झाले आहे. कॅबचा मासिक खर्च कधीकधी किराणा मालाच्या खर्चापेक्षा जास्त असतो. या सर्व परिस्थितीत आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
आता पुण्यात नाईट शिफ्ट केल्यानंतरही नागरिकांना घरी जाताना जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कारण पीएमपीची रात्रीची बससेवा आता रात्रीच्या वेळी सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना आता मध्यरात्रीनंतरही आरामात घरी जाता येणार आहे.
त्यामुळे पीएमपीच्या या निर्णयाचे सध्या पुणेकरांकडून कौतुक होत आहे. कामगार, विद्यार्थी, महिला प्रवासी आणि रात्रीच्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांसाठी रात राणी बससेवा फायद्याची ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सुरक्षित प्रवास आणि परवडणारा प्रवास यामुळे रात्रीच्या बससेवेला नागरिकांचा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. दरम्यान, आता पीएमपीतर्फे ही रात्रीची बससेवा कोणत्या मार्गांवर चालवली जाणार आहे आणि या बससेवेची नेमकी वेळ कशी असेल याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
1) पुणे स्टेशन ते कोंढवा गेट – ही बस पुणे स्टेशनवरून 10:30, 12:30 आणि 3:45 वाजता सुटेल. तसेच कोंडवा येथून 11:15, 1:45 आणि 5 वाजता बस सुटेल.
2) निगडी ते पुणे स्टेशन वाकडेवाडी मार्गे – निगडीहून 11:30, 1:30 आणि 3:30 वाजता बसेस सुटतील. तसेच पुणे स्थानकातून 12:30, 2:30 आणि 4:30 वाजता बस सुटेल.
3) हडपसर ते पुणे स्टेशन – हडपसर येथून 10:20, 11:40, 1:00 आणि 3:45 वाजता बसेस सुटतील. तसेच पुणे स्थानकातून 10:50, 12:20, 1:40 आणि 4:15 वाजता बस सुटेल.
4) हडपसर ते स्वारगेट – बसेस 10:20, 11:40, 1:00 आणि 3:45 वाजता सुटतील. स्वारगेटहून 10:50, 12:20, 1:40 आणि 4:15 वाजता बस सुटेल.
5) कात्रज ते पुणे स्टेशन – बसेस कात्रजहून 11, 12:30, 2 आणि 3:25 वाजता सुटतील. तसेच, बस पुणे स्थानकातून 11:50, 1:20, 2:40 आणि 4:10 वाजता सुटेल.
6) कात्रज ते वाकडेवाडी नवीन एसटी स्थानक – बसेस कात्रज येथून 11:30, 1:30 आणि 3:30 वाजता सुटतील. तसेच, नवीन एसटी स्थानकातून वाकडे वाडी येथे 12:30, 2:30 आणि 4:30 वाजता बस सुटेल.
 
			 
											
Comments are closed.