मोठी बातमी! आता 'या' वाहनधारकांना भरावा लागणार दुप्पट कर! महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक 2026 एकमताने मंजूर

- 'या' वाहनधारकांना दुप्पट कर भरावा लागणार आहे
- महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक 2026 एकमताने मंजूर
- वाहनांवरील पर्यावरण करात वाढ
मुंबई : “महाराष्ट्र मोटर” जी राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकासाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026″ आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर पर्यावरण कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दर पाच वर्षांनी एकरकमी शुल्क आकारले जाईल.
या सुधारित कर रचनेमुळे राज्याला वार्षिक ₹160 कोटींहून अधिक महसूल मिळणार आहे ज्याचा उपयोग रस्ता सुरक्षा, आधुनिक वाहतूक सुविधा, ATS यंत्रणा आणि प्रशिक्षणासाठी केला जाईल. तसेच, औद्योगिक क्षेत्राला दिलासा देत क्रेन वाहनांवरील मोटार वाहन करासाठी ₹३० लाखांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Mahavitaran News : महावितरणचा 'स्मार्ट' दणका! थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता घरी बसून खंडित होणार आहे
हे विधेयक नागरिकांना BS-VI आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यास आणि राज्याचे पर्यावरण धोरण मजबूत करण्यास प्रोत्साहित करेल. याशिवाय ग्रामीण व आदिवासी भागात दरवर्षी जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही आणि त्याऐवजी महसूल वाढण्यास मदत होईल. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करून एकमताने मंजुरी दिल्याने हा निर्णय राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) कायदा, 2025 अंतर्गत कर दर सुधारित केले. 20-30 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कार आणि सीएनजी वाहनांवरील कर 1% वरून 2% करण्यात आला आहे, जो 1 जुलै 2025 पासून लागू झाला आहे. कर आता 11% पर्यंत 11% आणि 10-10 लाख रुपयांपर्यंत 12%, 20-20 लाख रुपयांपर्यंत असेल. (डिझेलसाठी 15%) 20 लाखांपेक्षा जास्त.
Comments are closed.