Big relief to congress leader rahul gandhi in savarkar defamation case as pune court grants bail


लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पुण्यातील सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राहुल गांधी हे या सुनावणीसाठी हजर झाले होते. त्यानंतर त्यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पुण्यातील सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राहुल गांधी हे या सुनावणीसाठी हजर झाले होते. त्यानंतर त्यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. (big relief to congress leader rahul gandhi in savarkar defamation case as pune court grants bail)

रायबरेलीचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात कथित अपमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. आजच्या तारखेला राहुल गांधी हे पुणे न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांना 25 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला.

– Advertisement –

हेही वाचा – Baldness : टक्कल पडण्याला ‘लोणार’चे पाणी कारणीभूत? वैद्यकीय अधिष्ठात्यांनी व्यक्त केली शक्यता

कॉंग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ नेता मोहन जोशी हे यावेळी राहुल गांधी यांना जामीन राहिले. गांधींची बाजू मांडणारे ऍड. मिलिंद पवार म्हणाले की, जामीन मंजूर करतानाच न्यायालयाने राहुल गांधी यांना या प्रकरणात प्रत्यक्ष हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट दिली आहे.

– Advertisement –

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. मार्च 2023 मध्ये राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या भाषणासंदर्भात ही तक्रार आहे. सावरकरांच्या एका पुस्तकाच्या हवाल्याने राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. (big relief to congress leader rahul gandhi in savarkar defamation case as pune court grants bail)

हेही वाचा – CM Devendra Fadnavis : स्वतंत्र विदर्भाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? सांगितला कन्नमवारांचा किस्सा

गेली काही वर्षे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. यामुळे ते नेहमीच वादात असतात. सावरकरांवर टीका केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत.



Source link

Comments are closed.