“पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीची धमाकेदार खेळी, ICC क्रमवारीत झेप घेतली!”

आयसीसीने बुधवारी ताज्या एकदिवसीय क्रमवारी जाहीर केल्या आहेत. याचा फायदा विराट कोहलीला झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. आयसीसीने कोहलीला त्याचे बक्षीस रँकिंगच्या माध्यमातून दिले आहे. एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. शुभमन गिल अव्वल स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहली सहाव्या स्थानावर होता. पण आता तो पाचव्या स्थानावर आला आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 111 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. विराट कोहलीच्या डावात 7 चौकारांचाही समावेश होता. सामन्यादरम्यान रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कोहलीने जबाबदारी सांभाळली आणि भारतासाठी शेवटपर्यंत खेळला. टीम इंडियाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला

वनडे मालिकेतील फलंदाजीमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व आहे. शुभमन गिल यामध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याला 817 रेटिंग मिळाले. बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला 770 रेटिंग मिळाले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 757 रेटिंग मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. कोहलीला 743 रेटिंग मिळाले.

दुखापतीमुळे शमी बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. पण आता त्याचे पुनरागमन झाले आहे. शमीने अनेक वेळा भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दोन सामन्यांमध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रमवारीत शमीला फायदा झाला आहे. तो आधी 15 व्या स्थानावर होता. पण आता तो 14 व्या स्थानावर आला आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा खेळाडू महिष तिक्शा अव्वल स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या :

आयपीएलसोबत कसोटी क्रिकेटची तयारी, बीसीसीआयनं आखला नवा प्लॅन

पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान भावुक, म्हणाले – देशात क्रिकेट संपुष्टात येईल!

शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या क्रिकेटपटूनं केली शिवलिंगाची पूजा, फोटो व्हायरल

Comments are closed.