बीएसएफसाठी मोठे यश

7 किलो हेरॉइनसह तस्कर ताब्यात

फिरोजापूर:

बीएसएफने पंजाबच्या फिरोजपूरमध्ये हेरॉइनला मोठ्या खेपसह एका तस्कराला अटक केली आहे. गुप्तचर शाखेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बीएसएफ जवानांनी योजनाबद्धपणे संशयिताच्या मार्गावर सापळा रचला होता. एका संशयिताला दुचाकीने येताना पाहून जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु त्याने पलायनाचा प्रयत्न केला असता जवानांनी त्वरित कारवाई करत त्याला पकडले आहे. या आरोपीची झडती घेतली असता हेरॉइनची 14 पाकिटे (एकूण वजन सुमारे 7 किलोग्रॅम) हस्तगत झाल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले आहे. तर आरोपी फिरोजपूरच टिंडीवाला गावाचा रहिवासी आहे. चौकशीदरम्यान त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणखी कारवाई केली जाणार आहे. बीएसएफने चालू महिन्यात मिझोरममध्ये देखील अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात मोहीम उघडली आहे. आयझोल-चंपाई महामार्गावर बीएसएफने अनेक संशयास्पद वाहनांना रोखून कमीतकमी 8 जणांना अटक केली होती. या आरोपींकडून सुमारे 50 किलो वजनाचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले होते. या अमली पदार्थांची किंमत जवळपास 75 कोटी रुपये इतकी होती.

 

Comments are closed.