अभिषेक शर्माचं स्थान धोक्यात? दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाकडून जोरदार टक्कर!

भारत आणि अफगाणिस्तान (3 match T20 series between India vs Afganistan) यांच्यात होणाऱ्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team india) घोषणा करण्यात आली आहे. यात अभिषेक शर्मालाही (Abhishek Sharma) संधी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत तो आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये नंबर एकचा फलंदाज होता, पण आता तो खाली आला आहे. यादरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसनेही (Dewald Brevis) त्याला आव्हान दिले आहे. आता अभिषेक शर्मा तिसऱ्या स्थानावरूनही खाली घसरू शकतो.

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी-20 रँकिंगमध्ये डेवाल्ड ब्रेविसने जबरदस्त झेप घेतली आहे. आता तो सहा स्थानांची भरारी घेत थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच, कधीकाळी नंबर एकवर राहिलेला अभिषेक शर्मा जास्त धावा करू न शकल्यामुळे आता तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. अभिषेक शर्माचे रेटिंग 819 आहे आणि डेवाल्ड ब्रेविसचे रेटिंग 806 आहे. म्हणजेच, दोघांमध्ये केवळ 14 गुणांचे अंतर आहे, जे कधीही संपू शकते.

सध्या दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये ब्रेविसने धमाकेदार फलंदाजी केली आहे, ज्याचा फायदा त्याला रँकिंगमध्ये मिळालेला दिसत आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात ब्रेविसने 75 धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्यातही नाबाद 75 धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यात त्याने 41 धावा केल्या. म्हणजेच दोन सामन्यांत त्याच्या नावावर दोन अर्धशतके जमा आहेत.

अभिषेक शर्मा आता थेट भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे, ज्याचा पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. त्याआधी ब्रेविसला तिरंगी मालिकेत आणखी काही सामने खेळण्याची संधी मिळेल. यादरम्यान, लवकरच ब्रेविस आणखी काही चांगल्या खेळी करून अभिषेक शर्माला मागे टाकू शकतो. म्हणजेच येणारे काही सामने अभिषेक आणि ब्रेविससाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तसेच, भारत-अफगाणिस्तान मालिकाही अभिषेकसाठी खास असेल, ज्यामध्ये त्याला धावा करणे गरजेचे असणार आहे.

Comments are closed.