वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; लग्नावेळी हुंड्यात घेतलेलं 51 तोळे सोनं राजेंद्र हगवणेंनी बँ
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीला तिच्या आई वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले 51 तोळे सोनं हगवणे कुंटुबाने गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे. लग्नात वैष्णवीला दिलेले 51 तोळे सोने हगवणे कुटुंबाकडून फेडरेल बँकेत गहाण ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीला लग्नामध्ये तिच्या माहेरकडून 51 तोळे सोने, चांदीची भांडी, फॉर्च्युनरसारखी आलिशान गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या होत्या. एवढंच नाही तर हगवणे कुटुंबियांना सात किलो चांदीची भांडी देखील लग्नात दिली होती.
इतकं सगळं दिल्यानंतर देखील हगवणे यांची लालसा वाढतच होती. त्यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे अनिल कस्पटे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली, पण त्यांनी पैसे न दिल्याने हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ वाढवला. तर आधी लग्नामध्ये दिलेलं 51 तोळं सोनं नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी बॅंकेमध्ये ठेवलं आहे? त्यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का? तसेच ते सोनं तारण ठेवण्यासाठी तिचा छळ करुन तिच्याकडून सोनं घेतलं का? सोने तारण ठेवण्यामागे आरोपींचा काय उद्देश काय होता? याबाबत पोलिस सध्या तपास करत आहे. लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून देण्यात आलेली फॉर्च्युनर कार व अॅक्टिवा गाडी जप्त केली आहे.
लग्नात काय-काय दिलं?
राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणात्सव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार होते. त्या दोघांना आज अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.
वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कृर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.
Comments are closed.