बिग बॉसच्या घरात घडले 'असे' काही; अभिनेत्रीचा लोकप्रिय क्रिकेटपटूवर गंभीर आरोप
बिग बॉसच्या घरात गोंधळ घालणारी अभिनेत्री कशिश कपूर हिने पुन्हा एकदा बवाली विधान करून खळबळ माजवली आहे. कशिशने उघड केले की, बिग बॉसच्या 18 व्या सीझनदरम्यान एका लोकप्रिय क्रिकेटपटूने तिच्यासोबत असे काही केले ज्यामुळे ती नाराज झाली. तिने नाव उघड केले नसले तरी, त्या क्रिकेटपटूने तिला एकटीने भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे सांगितले. मात्र, अजूनपर्यंत तो क्रिकेटपटू कोण हे स्पष्ट झालेले नाही.
एका मुलाखतीत कशिश कपूर हिने सांगितले की, बिग बॉसच्या घरातच तिला हा “भयानक” अनुभव आला. “ते खूप पॉप्युलर क्रिकेटर आहेत. त्यांनी मला एकटीने भेटायला बोलावले होते. मी लगेच नकार दिला. माझ्यासाठी तुम्ही फक्त एक मुलगा आहात, फक्त क्रिकेटर असल्यामुळे मी इम्प्रेस होणार नाही,” असे तिने स्पष्ट केले.
कशिशने सांगितले की, त्यांना वाटले की क्रिकेटर असल्यामुळे तिला इम्प्रेस करणे सोपे जाईल, पण तिला ती गोष्ट अजिबात आवडली नाही. “तुम्ही क्रिकेटर आहात, हे तुमचे काम आहे आणि मी त्याचा सन्मान करते, पण माझ्यासाठी तुम्ही ना बॅटिंग करणार, ना बॉलिंग, ज्याने मी प्रभावित होईन,” असे ती म्हणाली.
याआधी जुलै महिन्यात कशिश कपूर हिने मुंबईतील अंधेरी येथील घरी 4.5 लाख रुपये चोरी झाल्याचा आरोप केला होता. तिने आपल्या हाऊसहेल्प सचिन कुमार चौधरी याच्यावर FIR दाखल केली होती. चोरीनंतर तो गायब आहे. आरोपानुसार, कशिशने आपल्या कपाटात 7 लाख रुपये ठेवले होते, जे तिला आईला पाठवायचे होते.
Comments are closed.