‘बिग बॉस’ 19 चा ग्रँड फिनाले उद्या रंगणार

२४ ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेला ‘बिग बॉस 19’ शो आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवरून पडदा हटवण्यात आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांना ट्रॉफीची झलक दाखवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नुकतीच यातील स्पर्धक मालती चहर शोमधून बाहेर पडली आहे, तर अंतिम पाचमध्ये अमाल मलिक, गौरव खन्ना, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट यांच्यात लढत रंगणार आहे. उद्या, 7 डिसेंबरला ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले सोहळा रंगणार असून नव्या सीजनमधील ‘बिग बॉस’ विजेत्याची घोषणा या कार्यक्रमाचा होस्ट अभिनेता सलमान खान याच्याकडून केली जाईल.

Comments are closed.