छोट्या पडद्यावर मोठं वादळ उठणार; ‘बिग बॉस’मध्ये समलैंगिक जोडप्याची एन्ट्री, कोण आहेत ‘त्या’ दोघी?

‘बिग बॉस’ हा शो आणि वाद याचे जुने नाते आहे. मग सलमान खान होस्ट करतो तो हिंदीतील ‘बिग बॉस’ शो असो किंवा अन्य दुसऱ्या भाषेतील, प्रत्येक वेळी या शोमध्ये काही ना काही तरी वादग्रस्त घडते आणि मग त्याची बातमी होते. यामुळेच ‘बिग बॉस’ हा शो प्रचंड प्रसिद्धही आहे. आता मल्याळम स्टार मोहनलाल यांचा ‘बिग बॉस मल्याळम’चा सातवा सिझन येत असून यात एका समलैंगिक जोडप्याला एन्ट्री देण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर मोठे वादळ उठणार हे निश्चित.
मोहनलाल यांच्या शोमध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांसह सामान्य लोकही दिसणार आहेत. यात मल्याळम कलाकार अनुमोल, आरजे बिंसी, रेणु सुधी आणि गिजेल ठकराल सारख्या बड्या नावांचाही समावेश आहे. यात अदिला आणि फातिमा नावाचे समलैंगिक जोडपेही दिसणार आहे. या दोघींनी सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. सगळीकडे सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे.
कोण आहेत अदिला आणि फातिमा?
अदिला नसरीन आणि फातिमा नुरा केरळमधील समलैंगिक जोडपे आहे. एकमेकींच्या प्रेमासाठी दोघींही अख्ख्या जगाशी लढाई केली होती. दोघींनी सोबत राहण्यासाठी कोर्टाचा दरवाजाही ठोठावला होता. यात त्यांना यश आले आणि दोघींची लव्हस्टोरी तुफान गाजली.
Comments are closed.