Bigg Boss Marathi 6 : घरात बनतोय नवीन ग्रुप? Wild Cards च्या येण्याने बदलणार घरातली समीकरणं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात गेल्या रविवारी तीन नवीन सदस्यांनी वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. त्यांच्या एन्ट्रीमुळे घरातले वातावरण चांगलेच तापले आहे. या वाईल्ड कार्ड सदस्यांसोबत घरातील काही जुन्या सदस्यांचे वाद होत असतानाच प्राजक्ता शुक्रे मात्र त्यांच्यासोबत नवीन ग्रुप तयार करत आहे.

प्राजक्ता, आयुष, करण, सचिन व सागर कारंडे यांचा बाल्कनी ग्रुप होता. मात्र सध्या या पाचजणांपैकी करण, आयुष व सचिन हे घराबाहेर पडले असून फक्त सागर व प्राजक्ता घरात आहेत. अशात प्राजक्ताला टोळी ग्रुपसोबत खेळावे लागत होते. त्यामुळे घरात आलेल्या नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे प्राजक्ता शुक्रेने तिची रणनीती बदलल्याचे बोलले जात आहे.

आजच्या भागात प्राजक्ता, रेवा आणि संकेत रंगणार आहे. प्राजक्ताचे म्हणणे आहे, मी तुझी चावी घेतली तुला वाईट वाटलं, पण त्यात तुझी देखील चूक आहे त्यावर रेवाचे म्हणणे, मला कुठलाही ग्रुप जॉईन नाही करायचा आहे. आता पण आपण याला ग्रुपचे नाव नं न देता आणि कोणासमोर reveal न करता एक काम करू शकतो एकेमकांसोबत उभं राहूया बस… प्राजक्ताने त्यावर तिला विचारले, तु अशी व्यक्ती आहेस ना जे बोलशील तेच करशील ? कि तू unpredictable आहेस ? त्यावर रेवा म्हणाली, मी जे पण करेन ते बोलून करेन.

रविवारी ‘भाऊच्या धक्क्या’वर रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके या तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी धडाक्यात एन्ट्री घेतली. या नवीन सदस्यांच्या येण्याने घरातील जुन्या सदस्यांची, विशेषतः प्राजक्ता शुक्रेची समीकरणे बदलताना दिसत आहेत.

बघूया आता हा नवा ग्रुप तयार होणार कि बनता बनता पाहून जाणार ? बिग बॉस मराठी सिझन ६ दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर.

Comments are closed.