बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान; तेजस्वी यादव, मैथिली ठाकूरसह दोन्ही उपम


बिहार निवडणूक 2025: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Election 2025) पहिल्या टप्प्याचे मतदान आज होणार आहे. या टप्प्यात 18 जिल्ह्यांतील 121 मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये प्रामुख्यानं तेजस्वी यादवाांच्या (Tejashwi Yadav) राघोपूर, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींचा तारापूरचा समावेश आहे. तसंच गायिका मैथिली ठाकूरांच्या (Maithili Thakur)अलीनगर या महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देऊ असं आश्वासन महागठबंधानाकडून दिलं गेलं आहे तर दुसऱ्या बाजूला NDA ने लाडकी बहीण योजना, जंगलराज मुक्त बिहार, नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विकासाचे व्हिजन असे मुद्दे प्रचारात आणले गेले आहेत. 243 जागांच्या विधानसभेतील उर्वरित 122 जागांसाठी 11 नोव्हेंबर मतदान होणार असून 14 नोव्हेंबरला मतमोजणी (Bihar Election Result) होणार आहे.

पहिल्या टप्प्यात, राज्यातील पाटणा, नालंदा, भोजपूर, बक्सर, शेखपुरा, लखीसराय, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, मुझफ्फरपूर, दरभंगा, सहरसा, मधेपुरा, सिवान, गोपालगंज, सारण, वैशाली आणि समस्तीपूर या 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या 121 जागांसाठी 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात 1192 पुरुष आणि 122 महिला आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 3 कोटी 75 लाख 13 हजार मतदार मतदानात सहभागी होतील. पहिल्या टप्प्यात रघुनाथपूर, गोपालगंज, महुआ, राघोपूर, अलीनगर, गौरा बौरम, बक्सर, दानापूर, मणेर, तारापूर, लखीसराय, मुंगेर आणि एकमा हे 13 विधानसभा मतदारसंघ लक्ष केंद्रीत करणार आहेत.

आज कोणत्या मतदारसंघासाठी मतदान होणार?

आलमनगर, बिहारीगंज, सिंहेश्वर (SC), मधेपुरा, सोनबरसा (SC), सहरसा, सिमरी बख्तियारपूर, महिसी, कुशेश्वर अस्थान (SC), गौरा बौरम, बेनीपूर, अलीनगर, दरभंग, दरभंग, दरभंग कोटी, जाले, गायघाट, औरई, मिनापूर, बोचरा, बोचनापूर (एससी), कुशेश्वर (एससी) कांती, बारुराज, पारू, साहेबगंज, बैकुंठपूर, बरौली, गोपालगंज, कुचायकोट, भोर (SC), हथुआ, सिवान, जिरादेई, दरगुंड, दारौली, दारौली गोरियाकोठी, महाराजगंज, एकमा, मांझी, बनियापूर, तरैया, मधौरा, चपरापूर, चपरापूर, ए. बरहार, आराह, त्यात आगियाओन (SC), तारारी, जगदीशपूर, शाहपूर, ब्रह्मपूर, बक्सर, डुमराव, राजपूर (SC) यांचा समावेश होतो.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Bihar Election 2025 Opinion Poll: बिहारचा ओपिनियन पोल समोर, एनडीएला छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; महागठबंधनला किती जागा मिळणार?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.