ठाणेकरांच्या 42 लाखांचा चुराडा; बाईक अॅम्ब्युलन्स धूळ खात, पालिकेच्या दुर्लक्षामुळे एकाही रुग्णाला उपयोग नाही

ठाणे न्यूज बाईक-गर्भपात-रुग्ण-रूग्ण-वापर-ड्यू-टू-टू-टू-टू-टू-टू-टू-टू

इमारत दुर्घटना, अपघात असो वा एखादे अग्निकांड तसेच जखमींवर गोल्डन अवरमध्ये उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने ३० बाईक अॅम्ब्युलन्स विकत घेतल्या होत्या. यासाठी ४२ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे या सर्व बाईक्स अक्षरशः धूळ खात पडल्या असून आतापर्यंत एकाही रुग्णाला याचा काडीचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे या बाईक अॅम्ब्युलन्स नेमक्या कोणाचे खिसे भरण्यासाठी विकत घेतल्या होत्या, असा सवाल ठाणेकरांनी केला आहे.

कोरोना काळ सरल्यानंतर ठाणे महापालिकेने आरोग्यविषयक कामांना प्राधान्य दिले खरे. त्यानुसार शहरात ३० बजाज अॅव्हेंजर बाईक खरेदी करून त्याचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर करण्यात आले. अपघात, आगीत होरपळणे, तलावात बुडणे, खड्यात अडकणे, इमारत दुर्घटना तसेच अन्य आपत्तीप्रसंगी मदतीसाठी येणाऱ्या रुग्णवाहिका वाहतूककोंडीमुळे घटनास्थळी पोहोचण्यास बराच विलंब होतो. अशावेळी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बाईक अॅम्ब्युलन्सची गरज लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने तब्बल ३० बाईक अॅम्ब्युलन्स सज्ज केल्या होत्या.

आपत्कालीन परिस्थितीत तसेच जिथे मोठ्या रुग्णवाहिका पोहोचत नाहीत अशा ठिकाणी तत्काळ पोहोचण्यासाठी या दुचाकींचा वापर होणार होता. दुचाकीमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, एलईडी फिल्टर लाईट, गार्ड, रेडीएम स्ट्रिक्स, सायरन अशा अत्यावश्यक सेवा पुरवल्या होत्या. अशा या सुसज्ज दुचाकी रुग्णवाहिका धूळ खात पडल्या असल्याने अनेक वेळा विरोधकांनी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.

अग्निशमन दलाला दुचाकींचा उपयोगच नाही

एकीकडे ठाणेकरांच्या आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी ठाणे महापालिका कोट्यवधी खर्च करण्यास मागेपुढे बघत नाही. दरवर्षी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत असताना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लाखोंच्या दुचाकी रुग्णवाहिका बंद अवस्थेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुरुवातीला या दुचाकी अग्निशमन दलाला देण्यात येणार होते. मात्र या विभागाने आम्हाला दुचाकी रुग्णवाहिकेचा उपयोग नसल्याचे सांगितले.

दुचाकींचा उपयोग शून्य

एका दुचाकीसाठी ९६ हजार ३५१ रुपये याप्रमाणे ३० दुचाकींसाठी २८ लाख ९० हजार ५३० रुपये इतका तर या दुचाकींवर आरोग्य साहित्य ठेवण्याची व्यवस्था उभारण्यासाठी १३ लाख ५१ हजार रुपये असा एकूण ४२ लाख ४२ हजार २१० रुपये खर्च करण्यात आला होता. इतका खर्च

Comments are closed.