अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये सभापती पदासाठी भाजप अन् एमआयएमची युती, राजकीय चर्चांना उधाण

अचलपूर नगर परिषद निवडणूक निकाल 2026 : अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये सभापती पदासाठी भाजप (BJP) अन् एमआयएमची (MIM) युतीच्या चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमद्वारे एकमेकांना साथ दिल्याचं (भाजप आणि एमआयएम युती) बोललं जातंय. एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाल्याची चर्चा आहे. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत आल्याने अचलपूरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशातच आता या युती संदर्भात भाजप नगराध्यक्षा रुपाली माथने यांni स्पष्टीकरण देत या चर्चावर भाष्य केलंहे.

BJP and MIM alliance : एमआयएम हिंदू विरोधी पक्ष, भाजपची कोणतीही युती आम्ही केलेली नाही

अचलपूर नगर परिषदेतील भाजप आणि एमआयएम यांनी विषय समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याच्या बातम्यानंतर भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तातडीने गंभीर दखल घेत अचलपूर मधील भाजपच्या नगराध्यक्षा रूपाली अभय माथणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. यावर बोलताना नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी सांगितले की, एमआयएम हा हिंदू विरोधी पक्षाशी भारतीय जनता पार्टीची कोणतीही युती आम्ही केलेली नाही आणि अचलपूर नगर परिषदमध्ये एमआयएम पार्टीचा कोणताही गट इथे अस्तित्वात नाही. अचलपूर नगर परिषदमध्ये काँग्रेस पक्षाचे 15 नगरसेवक असून त्यांनी दि. 21जानेवारी रोजी झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला नाही. असे स्पष्टीकरण भाजपच्या नगराध्यक्षा रूपाली माथणे यांनी दिलंय.

दरम्यानअचलपूर नगर परिषदमध्ये काँग्रेस पक्षाचे 15 नगरसेवक, 3 नगरसेवक एमआयएमचे, 2 नगरसेवक राष्ट्रवादीचे, 1 नगरसेवक अपक्ष असे एकूण 21 मुस्लिम नगरसेवक निवडून आलेले आहेत. तसेच, अचलपुर नगर परिषदमध्ये प्रहार पक्षाचे 2 नगरसेवक भाजपचे आणि अपक्ष मिळून 10 नगरसेवक आणि अपक्ष 8 नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. इथे काँग्रेस आघाडीचा एक गट, अचलपूर विकास आघाडीचा एक गट आणि अचलपूर परतवाडा विकास आघाडीचा एक गट तसेच भाजपचा एक गट असे बलाबल आहे. तसेच, भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष असून सध्या मीडिया वर सुरु असलेली बातमी ही खोटी आहे.असं स्पष्टीकरण नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी दिले आहे.

अचलपूर नगर पालिका निकाल

नगराध्यक्ष पदी भाजपच्या रुपाली माथने विजयी

सदस्य संख्या

काँग्रेस – 15

भाजप – 9

एमआयएम – 3

प्रहार – २

अपक्ष – 10

ही बातमी वाचा:

Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त

आणखी वाचा

Comments are closed.