शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शि
नाशिकचे राजकारण : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) नाशिक जिल्ह्यात महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील 15 जागांपैकी 14 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झालाय. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत देखील नाशिकमध्ये महायुती वरचढ ठरेल, असे बोलले जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत महायुतीत बंडखोरी करत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेलेले नेते पुन्हा घरवापसी करण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) मोठं इनकमिंग सुरु असल्याचे दिसून येत आहे. पक्ष प्रवेशावरून नाशिकमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेनेत संघर्ष होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची स्वबळावर सत्ता होती. भाजपचे सत्तरहून अधिक नगरसेवक नाशिक महापालिकेत होते. त्यामुळे महापालिकेचा कारभार करताना त्याचा फायदा झाल्याचे दिसून आले होते. परंतु सध्या या नगरसेवकांना सांभाळताना पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेना शिंदे पक्षाने महापालिकेची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र शिंदे गटाकडे नाशिकमध्ये मोजकेच माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे अन्य पक्षांतून नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने विशेष रणनीती आखली आहे. त्या दृष्टीने शिवसेना पदाधिकारी दररोज विविध पक्षांच्या नगरसेवकांना संपर्क करीत असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत निकालामुळे विरोधी पक्षांतील अनेक नगरसेवकांचे मनोबल घसरले आहे. या नगरसेवकांना विकास निधीचे आमिष दाखवून आपलेसे करण्यासाठी शिवसेना शिंदे गट प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे.
भाजप-शिवसेनेत संघर्ष?
यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे प्रभागात विकासकामांसाठी निधी देण्याचे प्रलोभन देऊन इतर पक्षातील माजी नगरसेवकांचे प्रवेश केले असल्याची तक्रार भाजपने मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या मिटींगमध्येही शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. शिवसेनेत होणाऱ्या पक्ष प्रवेशाला भाजपाचा अप्रत्यक्षपणे विरोध असल्याचे पाहायला मिळत असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मराठी : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं
अधिक पाहा..
Comments are closed.