दिल्लीने मतदान केल्यामुळे भाजप सत्तेत परत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भाजप २७ वर्षांनी दिल्लीमध्ये सत्तांतर करण्यात यशस्वी झाला असुन दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान झाले होते.भारतीय जनता पार्टीच्या जवळ जवळ 46 उमेदवारांनी मतमोजणीत आघाडी घेतली असून, आम आदमी पक्षाच्या 24 उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडला असून, एकाही जागेवर काँग्रेस पक्षाला आघाडी मिळाली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे सरकार दिल्लीमध्ये स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला असुन. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी विजयी झाल्या आहेत. जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे.पीएम मोदी आज संध्याकाळी ७ वाजता भाजप कार्यालयाला भेट देणार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव
दिल्लीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव, 0.03 टक्के मतदान. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 23 जागा लढवल्या होत्या. सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे
भाजपने केले पोस्टर जाहीर
भाजप बहुमताने विजयाकडे वाटचाल करत आहे आणि आम आदमी पक्ष खूप मागे आहे. दरम्यान, भाजपने एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये इंडिया गेटवर कमळ फुललेले दिसत आहे.
दिल्ली विधानसभेच्या निकालावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया
अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते, मतदारांचा विश्वास नव्हता की हे आमच्यासाठी काही करतील. मी वारंवार सांगितलं मात्र त्यांनी ऐकलं नाही. दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असं लोकांना वाटायला लागलं.
– अण्णा हजारे, समाजसेवक
Comments are closed.