राज्यसभेत भाजपाने 100 ओलांडले
नवी दिल्ली :
आगामी 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी भाजपला राज्यसभेत पुन्हा राजकीय आघाडी मिळाली आहे. पहिल्यांदाच एप्रिल 2022 नंतर भाजपने पुन्हा राज्यसभेत 100 चा आकडा ओलांडला आहे. अलिकडेच नामनिर्देशित करण्यात आलेले तीन सदस्य उज्ज्वल निकम, माजी विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर यांनी भाजपचे सहकारी सदस्यत्व स्वीकारले आहे. यामूण्s आता पक्षाचे राज्यसभेत एकूण 102 खासदार झाले आहेत. राज्यसभेत सध्या एकूण सदस्य संख्या 240 असून यात 12 नामनिर्देशित सदस्यही सामील आहेत. तर 5 जागा रिक्त आहेत. 31 मार्च 2022 रोजी 13 राज्यसभा जागांवर झालेल्या निवडणुकीनंतर भाजपची सदस्यसंख्या 97 वरून वाढत 101 जाली हाती, यामुळे वरिष्ठ सभागृहात 100 हूनअधिक खासदार असलेला भाजप हा काँग्रेसनंतर इतिहासातील दुसरा पक्ष ठरला होता. काँग्रेसला ही कामगिरी 1988-1990 दरम्यान करता आली होती. परंतु 2022 नंतर भाजपच्या संख्याबळात घट होत हा आकडा 99 वर आला होता. आता नामनिर्देशत सदस्य भाजपमध्ये सामील झाल्याने पक्षाने पुन्हा 100 चा आकडा पार केला आहे. रालोआचे आता राज्यसभेत एकूण 134 खासदार आहेत. तर बहुमताचा आकडा 121 असून तो रालोआने पार केला आहे. राज्यसभेत वाढलेल्या बळामुळे भाजपला आता विधेयके संमत करवून घेण्यास फारसा अडथळा येणार नाही. राज्यसभेत सरकारला सहजपणे विधेयके संमत करविता येणार आहेत.
Comments are closed.