धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हण
धाराशिव: नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना डिवचलं आहे. मतदारसंघात लावलेल्या बॅनरमधून आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना डिवचल्याचं दिसून येत आहे. धाराशिव नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवरती “बाळ नाद करायचा” नाही म्हणत नाव न घेता ओमराजेंना डिवचले आहे.
धाराशिव शहरभरात नगरपालिका निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयानंतर भाजपाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासयोर आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात “बाळ” या शब्दावरून बॅनरबाजी झाली होती. भाजपकडून मतदारांचे आभार मानण्यासाठी लावलेले हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या चर्चेत आले आहेत.
Dharashiv News: खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा हादरा, नगरपालिका निवडणुकांमध्ये सुपडा साफ
नगरपरिषद निवडणुकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका निवडणुकांत त्यांच्या गटाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करत बहुतेक ठिकाणी सत्ता मिळवली आहे.
धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकांत भाजप आणि शिंदे गटाने संघटनात्मक ताकद दाखवली आणि मोठं यश देखील मिळवलं. तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरूम येथे भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता मिळवली, तर उमरगा, कळंब आणि परंडा येथे शिवसेना शिंदे गटाने आपला गड कायम राखला. विशेष म्हणजे, भूम नगरपरिषदेत बड्या राजकीय पक्षांना धक्का देत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे.
तुळजापूर नगरपरिषदेत भाजपाचे विनोद गंगणे अध्यक्षपदी निवडून आले असून, येथे भाजपने 23 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे. नळदुर्गमध्ये भाजपाचे बसवराज धरणे अध्यक्ष झाले असून, येथेही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मुरूम नगरपरिषदेत भाजपाचे बापुराव पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखत अध्यक्षपद पटकावले. शिवसेना शिंदे गटाने उमरगा, कळंब आणि परंडा या नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. उमरग्यात किरण गायकवाड अध्यक्ष झाले असून, शिंदे गटाने येथे 12 जागांवर विजय मिळवला आहे. कळंब नगरपरिषदेत तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांनी 2,254 मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्ष झाल्या. परंड्यातही शिंदे गटाचे जाकीर सौदागर अध्यक्ष झाले आहेत. भूम नगरपरिषदेत मात्र चित्र वेगळे दिसून आले. आलमप्रभू भूम शहर विकास आघाडी आणि जनशक्ती नगर विकास आघाडी या स्थानिक आघाड्यांनी एकत्रितपणे राजकीय पक्षांना मागे टाकत सत्ता मिळवली.
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
आणखी वाचा
Comments are closed.