Bjp leader chandrashekhar bawankule attack on congress rahul gandhi visits parbhani somnath suryavanshi death
कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी सोमवारी परभणीत जात सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येला मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीक राहुल गांधी यांनी यावेळी केली. त्यावरून भाजपा नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील परभणीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांच्या मारहाणीत कथितरित्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून चांगलेच राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी सोमवारी परभणीत जात सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येला मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीक राहुल गांधी यांनी यावेळी केली. त्यावरून भाजपा नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. (bjp leader chandrashekhar bawankule attack on congress rahul gandhi visits parbhani somnath suryavanshi death)
बावनकुळे म्हणाले की, सरकारला जे करणे गरजेचे होते, ते सगळे सरकारने केले आहे. राहुल गांधी यांनी कधीच सरकार चालवले नसल्याने त्यांना याची माहिती नाही. यासंदर्भात आवश्यक ती सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी इथे केवळ नौटंकी करण्यासाठीच आल्याची टीका देखील त्यांनी केली.
– Advertisement –
हेही वाचा – Nitin Gadkari Apology : जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरकरांची माफी मागतात तेव्हा…काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा या घटनेला हवा देणारा आहे. परभणी प्रकरण आम्ही अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले होते. तसेच याप्रकरणी योग्य ती कार्यवाही देखील केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची नौटंकी येथे चालणार नाही, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
– Advertisement –
दरम्यान, सोमवारी सकाळी कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी परभणीला जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संविधानाचे संरक्षण करणाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सूर्यवंशींची हत्या केली आहे. दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांची ही हत्या केली आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल सभागृहात खोटी माहिती दिली असा गंभीर आरोप केला आहे.
हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : वाल्मिक कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे तरीही मोकाटच…दमानिया आक्रमक
राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. ते दलित असल्यामुळे त्यांची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली. यामागे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची विचारधारा आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मी पाहिला आहे. त्यावरुन स्पष्ट दिसत आहे की, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar
Comments are closed.