शिवसेनेचा बाप मीच, भाजप नेते परिणय फुकेंच्या वक्तव्यावर शिवसैनिक संतापले, म्हणाले, माफी मागा, अ

परिच्छेद Pauke: भंडाऱ्यामध्ये नुकत्याच सहकार क्षेत्राच्या निवडणुका पार पडल्या आणि यानंतर भाजप आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमादरम्यान मीच शिवसेनेचा बाप असं वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर भंडाऱ्यातील तमाम शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपा विरोधात रोष बघायला मिळत आहे. भाजप आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या या विधानानंतर भाजप आणि शिवसेना हे एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परिणय फुकेंनी 12 तासांच्या आत जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिंदे गटाचे लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर यांनी दिला आहे.

परिणय फुके म्हणाले की, ज्यांनी आपल्या पक्षासाठी काम केले, त्यांचं अर्ध्या रात्री देखील काही काम असेल तर आम्ही त्यांच्यासोबत उभे असतो. पण, ज्यांनी धोका दिला त्यांना कधी कधी माफ करतो. सहकार क्षेत्रामध्ये आपली चांगले सुरुवात झालेली आहे. आता स्वतःच्या ताकदीवर आपण दोन्ही जिल्ह्यात सहकार क्षेत्रात मुसंडी मारू. सहकार क्षेत्रात आपल्या पक्षाचे वर्चस्व निश्चितच आपण स्थापन करू. काही लोकांनी माझ्यावर आरोप केले. मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही. परंतु त्यादिवशी माझ्या चांगले लक्षात आले, जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाहीतर आईचं कौतुक केले जाते. काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले. याउलट जर काही वाईट झाले तर दोष बापावर केला जातो. त्यामुळे मला पक्कं माहिती झालं, शिवसेनेचा बाप मीच आहे. खापर माझ्यावर फोडले जाते, असे त्यांनी म्हटले.

शिवसेनेचा परिणय फुकेंना इशारा

तर परिणय फुके यांच्या वक्तव्यावर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय. शिंदे गटाचे लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे पिता आहेत. कुणीही आमचा बाप होण्याचा प्रयत्न करू नका. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत परिणय फुके यांनी शिवसेना उमेदवार प्रकाश मालगावे यांना हरवण्याचे काम केले. त्यांनीच काँग्रेसच्या उमेदवाराला सहा मते देण्याचा डाव खेळला. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. आता फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानकारक शब्दाचा वापर केल्याने कार्यकर्त्यांचे मन दुखावले गेले आहे. परिणय फुकेंनी 12 तासांच्या आत जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=AWBO4HG_2DC

आणखी वाचा

कोथरुड पोलिसांनी तिन्ही तरुणींचा कोठडीत छळ केला, पण एका स्टेटमेंटमुळे छ. संभाजीनगरच्या पोलिसांना हात हलवत माघारी फिरावं लागलं

आणखी वाचा

Comments are closed.