Bjp leader sudhir mungantiwar warns of filing a complaint against ministers in marathi


भाजपचे अभ्यासू आमदार म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत आपल्याच सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेत सहकारी पक्षाच्या मंत्र्याला अडचणीत आणले.

Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : भाजपचे अभ्यासू आमदार म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत आपल्याच सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेत सहकारी पक्षाच्या मंत्र्याला अडचणीत आणले. प्रलंबित देयकांवर व्याज देण्याची सरकारच्या नियमात तरतूद नाही, या मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उत्तरावर मुनगंटीवार यांचा पारा चढला. त्यांनी चंद्रपूरच्या कंत्राटदाराला द्याव्या लागलेल्या व्याजासह रक्कमेचा दाखला देऊन पाटील यांना उत्तर दुरुस्त करण्यास भाग पाडले. मुनगंटीवार यांच्या या पावित्र्याने विरोधी बाकापेक्षा सत्ताधारी बाकालाच जास्त धक्का बसला. (bjp leader sudhir mungantiwar warns of filing a complaint against ministers)

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आज विधानसभेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत सुरू राहिलेल्या चारा छावण्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. सहा वर्ष उलटूनही चारा छावण्या चालकांना सरकारकडून अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याबाबत त्यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी अनुदानाची प्रलंबित रक्कम तात्काळ वितरित केली जाईल, असे आश्वासन मकरंद पाटील यांनी दिले. त्यावर उपप्रश्न करताना देशमुख यांनी हे अनुदान व्याजासह देण्याची मागणी केली.

हेही वाचा – Sudhir Mungantiwar On Karad : मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण, मुनगंटीवारांच्या सवालामुळे खळबळ

या मागणीवर पाटील यांनी सरकारी नियमात व्याजासह अनुदान देण्याची तरतूद नाही, असे स्पष्ट करत देशमुख यांची मागणी फेटाळून लावली. मंत्र्यांच्या या उत्तरावर सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एका कंत्राटदाराला द्याव्या लागलेल्या सव्याज देयकाचा उल्लेख करत पाटील यांना उघडे पाडले.

चंद्रपुरातील एका कंत्राटदाराला न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारला अडीच कोटी रुपयांच्या देयकांवर तब्बल 513 कोटी रुपये द्यावे लागल्याची धक्कादायक माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ही देणी गरिबांची, शेतकऱ्यांची आहेत म्हणून तुम्ही व्याजासह देयक देणार नाहीत काय? असा सवाल करत मुनगंटीवार यांनी व्याजासह अनुदान देता येणार नाही हे मंत्र्यांचे उत्तर चुकीचे असल्याचे सुनावले. मंत्र्यांनी आपले उत्तर दुरुस्त करावे अन्यथा त्यांच्यावर आपण हक्कभंग दाखल करू, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला. हक्कभंगाची ही मात्रा बरोबर लागू पडली आणि मकरंद पाटील यांनी तरतूद तपासण्याची तसेच चारा छावणी चालकांना अनुदान देण्यास विलंब का झाला याची चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही सभागृहाला दिली.

हेही वाचा – Ashish Shelar And Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, मी देखील चुकून काही काळ, आशिष शेलारांनीच दिले उत्तर



Source link

Comments are closed.