बीडच्या संतोष देशमुख प्रकरणाबाबत प्रश्न विचारला; पंकजा मुंडे पत्रकारावरच संतापल्या

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देण्याएवजी पंकजा मुंडे पत्रकारवच संतापल्याचे दिसून आले. आपण आता पुण्यात आहोत. पुण्याबाबतचे प्रश्न विचारा, पुण्यात बीडबाबतचे प्रश्न का विचारत आहात, असा सवाल करत त्या पत्रकारवच संतापल्याचे दिसून आले.
पुण्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे पक्षकारवरच भडकल्याची घटना घडली आहे. त्यांना संतोष देशमुख प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या संतापून म्हणाल्या की, संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही. हे सगळे गृह खात्याकडे असते. त्यांना माहिती असेल. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याची वेगळी चौकशी करावी, अशी मी मागणी केली आहे. या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही. तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जलदगतीने चौकशी झाली पाहिजे, आरोपीला शिक्षा द्यावी हे आपण आधीच स्पष्ट केले आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी पुण्यात आले आहे. तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात. पुण्यातले प्रश्न विचारा. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत. त्याबाबत का बोलत नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच संतापल्या.
Comments are closed.