आव्हाड तुम्ही, धुतल्या तांदळाचे नाहीत! सकाळपासून शांत असलेल्या पडळकरांचा संयम सुटला
गोपीचंद पादलकर आणि जितेंद्र एडब्ल्यूएचएडी: विधानभवनातील कालच्या राड्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. काल विधानभनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्याला गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला होता. विरोधकांनी आज सकाळपासून या घटनेवरुन भाजप आणि महायुती सरकारला धारेवर धरले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री पोलिसांच्या गाडीसमोर आडवे पडून आंदोलन केले होते. यानंतर आज सकाळपासून आव्हाडांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांसमोर येत भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सकाळपासून संयम राखून असलेल्या गोपीचंद पडळकर यांचा राग पुन्हा एकदा उफाळून आला. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला.
जितेंद्र आव्हाड यांना म्हणावं की, मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तुम्ही धुतल्या तांदळाचे नाहीत, मला सगळ्यांबाबत सर्व काही माहिती आहे. आज सकाळपासून आव्हाडांचं जे नाटक सुरु आहे ना त्यावर मी सविस्तर बोलेन. मला न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे मी शांत आहे. पण मी याबाबत सविस्तर बोलेन. तोपर्यंत आव्हाडांनी माझ्या मौनाचा चुकीचा अर्थ काढू नये, असे पडळकर यांनी म्हटले. यावर पत्रकारांनी तुम्ही आव्हाडांना परत धमकावत आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर पडळकर म्हणाले की, यात कसली आली आहे धमकी? आता आपले मुद्दे सविस्तर मांडायचे देखील नाहीत का? कोणी चुकीचं बोललं असेल तर त्याला उत्तर दिले पाहिजे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
opichand Padalkar: आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते: गोपीचंद पडळकर
काल मी या सगळ्या प्रकारावर भूमिका व्यक्त केली होती. मी माननीय अध्यक्ष महोदयांकडे दिलगिरी व्यक्त केली. मी अध्यक्षांना विनंती केली होती की, आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली. त्यांना सक्त ताकदी देऊन जी काय कारवाई करायची ती करा, असे मी त्यांना सांगितले. हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारितील विषय आहे. रात्री उशीरा याप्रकरणात एफआयआर दाखल झाला. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे सर्वोच्च असतात. त्यांच्या भूमिकेवर आमचं कुठलंही मत नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
माझी लक्षवेधी असल्यामुळे मी दिवसभर सभागृहात होतो. रात्री सभागृहात मंत्री नसल्यामुळे माझी लक्षवेधी रद्द करण्यात आली, त्यामुळे मी सभागृहाबाहेर आलो. आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे, आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही याविरोधात न्यायालयात लढाई देऊ, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=0juaudptw
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.