भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना ऑफर; तुमची सत्तेत गरज, अजित पवारांच्या जयंतीनिमित्ताने एकत्र
रत्नागिरी : सध्या भाजप आणि शिवसेना (Shivsena) पक्षाकडून विरोधी पक्षातील आमदार, खासदार गळाला लावले जात आहेत. नुकतेच ठाकरेंच्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, ठाकरेंचे आमदारही त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर, विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक असलेल्या भास्कर जाधवांचेही नाव या यादीत जोडले जाते. मात्र, आता भाजपा आमदारानेच थेट भास्कर जाधव यांना ऑफ दिली आहे. भास्कर जाधव यांची सत्तेत गरज असल्याचं आमदार प्रमोद जठार (Pramod jadhar) यांनी म्हटलं. जठार यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जंयतीनिमित्त आमदार प्रमोद जठार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव एकत्र आले होते. येथील कार्यक्रमानंतर आमदार जठार यांनी माध्यमांशी बोलताना भास्कर जाधवांना थेट ऑफरच दिली. भास्कर जाधव कोकणाला तुमची गरज आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे असे म्हणत एकप्रकारे भाजप आमदार प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना खुली ऑफरच दिली आहे. भास्कर जाधव जेष्ठ आमदार असून राज्याच्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान आहे. उबाठामध्ये त्यांना जे काम द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, त्यांचा उपयोग उबाठाकडून केला जात नाही. त्यांना विरोधी पक्षनेताही करत नाहीत. त्यामुळे, भास्कर जाधव यांची सत्तेत गरज असल्याचंही जठार यांनी म्हटलं. उबाठामध्ये त्यांना जे काम द्यायला पाहिजे ते दिले जात नाही. चिपळूणमध्ये आम्ही दोघांनी आज एकच झाड लावलं, ते झाड भविष्यात चांगली फळे देईल, असेही भाजप आमदार प्रमोद जठार यांनी म्हटले, आमदार जठार यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.