संतोष बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कलंक, भाजपने मिंध्यांना डिवचले

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गट व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.कधी भाजप तर कधी मिंधे गटाकडून एकमेकांवर चिखफेक केली जात आहे.गुरुवारी देखील भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मटका, जुगाराचे अड्डे चालवून तरुणांची पिढी बरबाद करणारे आमदार संतोष बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कलंक असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला. नगरपालिकेच्या निवडणुकीत मिंधे गट चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल, असे भाकीतही त्यांनी केले.

Comments are closed.