अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा जुगार अड्डा उद्ध्वस्त! पोलीस निरीक्षक ज्योती गडकरींचा ‘धडाका’; २१ जुगारी अटकेत

अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी भागात सुरू असलेल्या अनधिकृत धंद्यांविरुद्ध पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ढोणे गल्लीतील एका जुन्या वाड्यात चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री सर्जिकल स्ट्राईक करत 21 जणांच्या मुसक्या आवळल्या. धक्कादायक बाब म्हणजे, हा अड्डा एका भाजप पदाधिकाऱ्याचा असून सत्तेच्या नावाखाली येथे कायद्याची ऐशीतैशी केली जात होती.

या प्रकरणी ​सुपे पोलीस ठाण्याच्या धडाकेबाज पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. ढोणे गल्लीतील एका जुन्या वाड्यात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या जुगारींचा राबता असल्याची माहिती गडकरींना मिळाली होती. पथकाने अत्यंत गुप्ततेने या अड्ड्याला घेराव घातला आणि छापा टाकला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 21 जणांना पोलिसांनी जमिनीवर लोळवून ताब्यात घेतले. ​

बीडपासून नगरपर्यंतचे कनेक्शन उघड

​हा जुगार अड्डा केवळ स्थानिक नव्हता, तर त्याचे धागेदोरे थेट बीड जिल्ह्यापर्यंत पसरले होते. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये नगर शहर, जिल्ह्यातील विविध तालुके आणि बीडमधील सराईत जुगारींचा समावेश आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या अड्ड्यावर 4 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम आणि मोबाईलचा समावेश आहे.

​भाजप पदाधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने खळबळ!

​ज्या वाड्यात हा ‘जुगाराचा बाजार’ भरत होता, तो वाडा भाजपच्या एका बड्या पदाधिकाऱ्याचा असल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. “सत्ता आपलीच आहे” अशा अविर्भावात वावरणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या आश्रयाने हा अड्डा सुरू होता का? असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. पोलिसांच्या या कारवाईने शहरातील गुन्हेगारांचे आणि त्यांच्या राजकीय पाठीराख्यांचे धाबे दणाणले आहेत. ​”कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हेच या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

पथकाने तात्काळ कारवाई करत खालील 21 जणांना ताब्यात घेतले –संजीव रामचंद्र राऊत (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर) अमर रुपा छाडेकर (रा. पारधी, ता. जामनेर, जि. जळगाव)गणेश प्रल्हाद चोभे (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर),राहुल प्रकाट भट (रा. तेलीखुंट, ता. जि. अहिल्यानगर),यशवंत पंढरीनाथ ढोणे (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर),हेमंत गणेश गायकवाड (रा. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापूर) समाधान श्रीमंत सुरवसे (रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड),जिजाबा रखमाजी भोसले (रा. पांडे, ता. करमाळा, jि. सोलापूर),अशोक विश्वनाथ चोभे (रा. केडगाव, ता. जि. अहिल्यानगर) विशाल रोहिदास नाकाडे (रा. कोठी, माळीवाडा, ता. जि. अहिल्यानगर),प्रेमशंकर गणेशलाल कश्यप (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर),मोहन दत्तु गोरे (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर),सतीश परशुराम जेजुरकर (रा. लोंढे मळा, केडगाव, ता. जि. अहिल्यानगर) अशोक बबन घोगरे (रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड),तुषार अशोक लड्डा (रा. अडतेबाजार, ता. जि. अहिल्यानगर),सुरज अशोक यादव (रा. भिसेगाव, ता. कर्जत, जि. रायगड),श्रीमंत निवृत्ती सुरवसे (रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड) जिशानखान मंजुरखान पठाण (रा. बेलदार गल्ली, ता. जि. अहिल्यानगर),अमोल महादेव कांबळे (रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) राजू रामदास जगताप (रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर),रिंटु नंदेलाल महातो (रा. विहार) अशी नावे आहेत.

4.93 लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून एकूण 4,93, 880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये रोख रक्कम, २० मोबाईल फोन व जुगार साहित्याचा समावेश आहे.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 83/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार सुपा,नगर तालुका, तोफखाना व पारनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरित्या पार पाडली.पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध जुगार अड्ड्यांवर मोठा आळा बसणार असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments are closed.