मी कुठं चुकले? भाजप आमदार-खासदारांना माझा सवाल, तेजस्वी घोसाळकरांसमोरच कार्यकर्तीची खदखद, संताप

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडी करताना झालेली बिघाडी मोठ्या बंडखोरीचे कारण ठरत आहे. कारण, भाजपाकडून (BJP) अनेक निष्ठावंताना डावलत नवख्यांना संधी देण्यात आलीय. त्यात, दहिसर येथील वार्ड क्रमांक 2 मधून भाजपने तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांना उमेदवारी दिल्याने येथील इच्छुक उमेदवार कार्यकर्त्या नाराज झाल्या आहेत. भाजपा महिला कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी आमदार मनिषा चौधरी खासदारांना व्यासपीठावरूनच थेट सवाल केला. तसेच, मला कुणीही थांबवू नका, मला बोलू द्या म्हणत, मनातील खडखद मांडली. (BMC Election 2026)

दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं आहे. या मेळाव्यात भाजपातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचे अभिनंदन करत, येथील वार्डमधून इच्छुक असलेल्या भाजपा कार्यकर्त्या यांनी आमदार मनिषा चौधरी (Manisha Chaudhari) यांच्यापुढे जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. पण, कार्यकर्ता काय असतो? असे म्हणत त्यांनी आमदार आणि खासदार गोपाल शेठ यांना सवाल केले आहेत. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)

मी काम केले आहे मी बोलणार, आम्ही युतीचे कार्यकर्ते आहोत. मी 10 वर्ष पक्षासाठी काम करते आहे, मनीषा चौधरी यांनी सांगितले तसे काम केले. त्यामुळे, मी कुठे चुकली? याचं उत्तर मला हवं आहे. मी कुठेच चुकली नाही, मी पक्षाचा आदर करते. परंतु मी कुठे चुकली आहे याचे उत्तर मनीषा ताई यांच्याकडून पाहिजे, अशा शब्दात भाजपा महिला कार्यकर्त्याने पक्ष नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. कार्यकर्त्या काय असतो, तो पक्षासाठी समर्पण असतो. महिला गॅस बंद करून पळतात, पुरुष आपली नोकरी सोडून यांच्या पाठीमागे पळतो. पण, काय केले यांनी आपल्याबरोबर? खोट्या मुलाखती… खोटे फॉर्म भरून घ्यायचे… असे म्हणत भाजपच्या महिला कार्यकर्त्याने कंठ दाटलेला असतांनाही मनातील खडखद बोलून दाखवली.

दरम्यान, भाजपने दहिसर मतदारसंघातून नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तेजस्वी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या उमेदवारीने येथे नाराजीचा सूर उमटल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?

आणखी वाचा

Comments are closed.