भाजपचा डोळा उत्तर भारतीयांच्या मतावर योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर प्रचाराच्या मैदानात

मुंबई भाजपाने उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवत प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरातील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गायिका आमदार मैथिली ठाकूर यांच्या प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, पनवेल या महापालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अनेक प्रभागांत उत्तर भारतीयांची मते निर्णायक आहेत. 2017च्या महापालिका निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहारी नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपने या वेळी योगी आदित्यनाथ यांच्यासह भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी, रवी किशन, मैथिली ठाकूर, गायक निरहुआ आदींना प्रचारात उतरविण्याचे ठरवले आहे. मुंबई महानगरातील हिंदी भाषिक मतदारांच्या पट्टय़ात या नेत्यांच्या सभा होतील.

Comments are closed.