Bjp will now allow dawood ibrahim to join the party trolls congress chief harshawardhan sapkal in marathi
आपल्या पक्षात कोणाला पक्षात प्रवेश द्यावा हा त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला आपण काय करतो आहोत, याचे भानही राहिलेले नाही. भाजपा या पक्षाची ओळख ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी आहे. पण आज या पक्षात गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचा प्रवेश झाला आहे.
Congress : मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन दिवसांनी शिवसेना ठाकरे पक्षाने बडगुजर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी केली. पक्षाकडून झालेल्या कारवाईमुळे सुधाकर बडगुजर नाराज झाले. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता. तरीही आज मंगळवार, 17 जून रोजी सुधाकर बडगुजर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून चांगलेच राजकारण रंगले आहे. यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (bjp will now allow dawood ibrahim to join the party trolls congress chief harshawardhan sapkal)
सपकाळ म्हणाले की, भाजप दाऊद इब्राहिमला देखील आपल्या पक्षात प्रवेश देणार आहे का? भाजप हा पक्ष आता राजकीय वॉशिंग मशीन झाला आहे. सध्या या पक्षात केवळ गुंड, गुन्हेगार तसेच भ्रष्ट लोकांचा भरणा झाला आहे, असेही सपकाळ म्हणाले. भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो. मात्र, शक्तीशाली असल्याचा आव आणणारा हा पक्ष सध्या कुणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपानेच केले, त्यांनाच आता सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व तारतम्य सोडून दिले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप ज्या व्यक्तीवर केले होते, त्यालाच सन्मानाने पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे आता भाजपा दाऊदलाही पक्षात प्रवेश देणार का?” असा संतप्त सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला.
हेही वाचा – Rohini Khadse : कोणे एके काळचे हिरवे आता…बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून काय म्हणाल्या रोहिणी खडसे
आपल्या पक्षात कोणाला पक्षात प्रवेश द्यावा हा त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला आपण काय करतो आहोत, याचे भानही राहिलेले नाही. भाजपा या पक्षाची ओळख ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी आहे. पण आज या पक्षात गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचा प्रवेश झाला आहे. मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहार प्रकरणी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी भाजपा सत्तेत भागीदारी करतो. प्रफुल्ल पटेलांना वॉशिंग मशीनमध्ये धुऊन स्वच्छ करतो. भाजपाचे हिंदुत्व बेगडी आहे, हे आम्ही सातत्याने सांगतो. तेच आजही दिसले,” असे सपकाळ म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली आहे. बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे, हे बावनकुळे यांनाही माहीत नव्हते. आयत्या वेळी त्यांना याची कल्पना दिली होती. त्यामुळे ते देखील या पक्ष प्रवेशाला उशीरा आल्याची टीका देखील त्यांनी केली.
Comments are closed.