पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर सदर ब्लॉकच्या हाथिलाका परिसरात काठ्या, सळ्या आणि कुऱ्हाडींच्या सहाय्याने सशस्त्र लोकांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्यात शमशेर खान यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य एक जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांना तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. भाजप नेत्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असून, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घरी नेणार नाही, असे म्हटले आहे. या प्रकारानंतर मेदिनीपूर मेडिकल कॉलेजजवळ मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते गोळा झाले होते. या प्रकारादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Comments are closed.