नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट, इराणमधील लष्करी कारवाईशी संबंध?
इस्रायल-अमेरिका आणि इराणध्ये मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू असताना नॉर्वेच्या राजधानीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील अमेरिकन दूतावासाजवळ हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे नॉर्वेजीयन पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र इराणमधील लष्करी कारवाईशी या स्फोटाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला अशी माहिती ओस्लो पोलिसांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. स्फोटाचे कारण किंवा त्यामागे कोण होते याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. मात्र घटनास्थळी मोठा आवाज झाल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Comments are closed.