आयपीएलनंतर आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा थरार भारतातही पाहायला मिळणार आहे का? एक मोठे अपडेट समोर आले आहे
आयपीएलनंतर आता आणखी एक मोठी विदेशी क्रिकेट लीग भारतात दाखल होऊ शकते. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी-20 लीग बिग बॅश लीगच्या एका सामन्याचा भारतात विचार केला जात आहे. वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिकारी याबाबत भारतात आले होते आणि संभाव्य यजमान शहरांचा आढावा घेण्यात आला आहे.
आयपीएलच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आता भारतात आणखी एका आंतरराष्ट्रीय टी-२० लीगचा थरार पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग आपल्या आगामी 16 व्या हंगामातील पहिला सामना भारतात आयोजित करण्याची योजना आखत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू केली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे दोन वरिष्ठ अधिकारी नुकतेच भारत भेटीवर आले होते आणि चेन्नई शहर हे संभाव्य यजमान ठिकाण मानले जात होते. मात्र, अद्याप फ्रँचायझींना अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Comments are closed.