हीदर नाइटने इंग्लंडसाठी इतिहास रचला, वनडेत सर्वाधिक धावा करणारी ठरली
महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या 27 व्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर शानदार विजय नोंदवला. रविवारी (26 ऑक्टोबर) झालेल्या या सामन्यात इंग्लंडने 169 धावांचे छोटे लक्ष्य सहज गाठले आणि 8 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. हा सामना न्यूझीलंडची दिग्गज खेळाडू सोफी डिव्हाईनच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामनाही होता.
या सामन्यात इंग्लंडची माजी कर्णधार हीदर नाइटने इतिहास रचला. इंग्लंडकडून खेळताना हीदर नाइटचा हा 104 वा एकदिवसीय विजय होता, तिने माजी कर्णधार आणि वर्तमान प्रशिक्षक शार्लोट एडवर्ड्स (103 विजय) यांना मागे टाकले. याचा अर्थ आता हीदर नाइट ही इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारी खेळाडू बनली आहे.
Comments are closed.