दीप्ती शर्माकडे मेगन शुटला मागे टाकून इतिहास रचण्याची मोठी संधी आहे, ती ही कामगिरी करणारी पहिली भारतीय ठरणार आहे.
भारत आणि श्रीलंका महिला संघ यांच्यातील T20 मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी (26 डिसेंबर) तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने याआधीच मालिकेत भक्कम आघाडी घेतली असून तिसऱ्या सामन्यातही त्यांची नजर मालिका जिंकण्यावर असेल.
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय फिरकी अष्टपैलू दीप्ती शर्मा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सौम्य तापामुळे ती दुसऱ्या टी-20 सामन्यात संघाचा भाग होऊ शकली नाही, परंतु आता ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी गुरुवारी (25 डिसेंबर) सामनापूर्व पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की दीप्ती उपलब्ध आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे.
Comments are closed.