या भारतीय वेगवान गोलंदाजाने घेतला मोठा निर्णय, क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून अचानक निवृत्ती घेतली.
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माने बुधवारी, ३ डिसेंबर रोजी एका भावनिक इंस्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि आयपीएलच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. हरियाणाच्या या ३७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने लिहिले की, क्रिकेटने त्याला खूप काही दिले आहे आणि आता तो हा सुंदर प्रवास येथे संपवत आहे.
मोहित शर्माने 2011-12 च्या रणजी हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला आयपीएल करार दिला, त्यानंतर त्याची कारकीर्द वेगाने पुढे गेली आणि लवकरच त्याला टीम इंडियाची कॅपही मिळाली.
Comments are closed.