लोअर परळला रक्तदान शिबीर
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या वतीने 29 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. श्रमिक जिमखाना मैदान, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड येथे सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत हे शिबीर होणार आहे. नायर रुग्णालय आणि केईएम रुग्णालय रक्तपेढीचे यासाठी सहकार्य लाभले असून रक्तदात्यांनी मोठय़ा संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी केले आहे.
Comments are closed.