मालकी हक्काच्या घरासाठी सोमवारी पालिका सफाई कामगार वर्षा बंगल्यावर धडकणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार आपल्या कुटुंबीयांसह मालकी हक्काच्या घराच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘वर्षा’ बंगल्यावर धडकणार आहेत. मुंबई महापालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्यात 29618 कामगार काम करीत असून त्यापैकी 5596 कामगारांना सेवानिवासस्थाने देण्यात आलेली आहेत. म्युनिसिपल मजदूर युनियनने केलेल्या सततच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक वेळा पालिकेतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळाली पाहिजेत अशी घोषणा केली होती, पण त्याची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने केलेली नाही. या पार्श्वभूमीवर सफाई कामगाराचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. भारतरत्न प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सफाई कामगारांना घरांच्या चाव्यांचे वाटप करावे अशी मागणी करणार असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर यांनी सांगितले.

Comments are closed.