काँग्रेस 156, वंचित 62, शरद पवार गटाला 9 वॉर्ड, मुंबईत काँग्रेस-वंचितचं जागावाटप आज जाहीर होण्य
BMC निवडणूक 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीकडून रविवारी जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही (NCP) या दोन्ही पक्षांशी पडद्यामागून चर्चा सुरु आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार कमी जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईत शरद पवार गटाला स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)
सूत्रांच्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडीची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला 62जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे तर काँग्रेस मुंबईत तब्बल 156 जागा लढण्याच्या तयारीत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. 2017 साली निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी केवळ एक जागा सोडण्यास काँग्रेस तयार आहे. उद्धव ठाकरेंची सेना काँग्रेसपेक्षा जास्त जागा देऊ करत असल्यामुळे ठाकरेंसोबत सुत जुळवून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. याबाबत आज दिवसभरात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 16 जानेवारीला 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. पुढील आठवड्यातील मंगळवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
BJP Shivsena seat sharing: मुंबईत भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा जवळपास फॉर्म्युला ठरला
मुंबईत आतापर्यंत भाजप आणि शिंदे गटात 207 जागांवर एकमत झालं आहे. पण तरीदेखील 20 जागांवर पेच कायम आहे. आतापर्यंत ठरलेल्या जागावाटपानुसार भाजपच्या वाटेला निवडणूक लढण्यासाठी 128 जागा आणि शिवसेना शिंदे गटाला 79 जागा देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.
KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत शिवसेना 65 जागांवर लढणार, भाजपला 57 जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेला किमान 65, तर भाजपला 57 जागा मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सता असल्याने कल्याण-डोंबिवलीत 84 जागा मिळाल्या तरच युती मान्य करायची अशी भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिका होती. मात्र, आता भाजप 57 जागांवर लढण्यास राजी झाल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.