उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावला; MIMचा ‘तो’हिंदू नगरसेवक कोण?
BMC निवडणूक निकाल 2026: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये खासदार ओवैसींच्या (Asaduddin Owaisi) एमआयएमचा (AIMIM) मोठा करिश्मा पाहायला मिळाला. अनेक महाालिकांमध्ये एमआयएमने मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं. ज्यामध्ये 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमने 125 जागा जिंकल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 33 नगरसेवक विजयी झाले आहेत. महापालिका निवडणुकीच्या एआयएमआयएमच्या (AIMIM) प्रभावी कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. असे असताना मुंबईतील एका AIMIMच्या विजयी हिंदू उमेदवार सध्या चर्चेत आहे. गोवंडीमध्ये विजय उबाळे यांनी 4,945 मतांनी विजय मिळवलाहे. त्यांनी वॉर्ड क्रमांक 140 मधील 16 उमेदवारांना पराभूत केलंय. विशिष्ट म्हणजे, असं बोललं जात आहे ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि वकिलांची फी भरण्यासाठी उबाळे यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. रुपयेही नव्हते. अशा उमेदवारावर ओवेसींनी विश्वास दर्शवला आणि विजय उबाळे यांni तर विश्वास सार्थकी लावलाय.
BMC Election Result 2026: ओवैसींच्या विश्वास सार्थकी लावत गोवंडीमध्ये दणदणीत विजय
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) मधील हिंदू उमेदवाराचा विजय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विजय उबाळे यांनी प्रभाग क्रमांक 140 मधील 16 उमेदवारांना पराभूत करून 4,945 मते मिळवली. या प्रभागात एकूण 25, 950 मते पडली, ज्यामध्ये उबाळे यांना २०% मते मिळाली. किंबहुनाया प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या 50% पेक्षा जास्त आहे. विजय उबाळे यांनी सोमय्या कॉलेजमधून बी.एससी. पदवी घेतली आहे आणि ते व्यवसायाने शिक्षक आहेत. ते खाजगी शिकवणी वर्ग देखील चालवतात, ज्यामुळे ते मुले आणि पालकांमध्ये प्रामुख्यानं ओळखले जातात. प्रभाग क्रमांक 140 चे एआयएमआयएम अध्यक्ष दिलशाद अन्सारी म्हणतात की या प्रभागात हिंदू आणि मुस्लिम मतदारांचे प्रमाण जवळजवळ समान आहे. असे असताना मतदारांनी विश्वास दर्शवत आम्हाला सह दिली आहे.
विजय उबाळे यांचे विजयी समीकरण (Who is Vijay Ubale)
विजय उबाळे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये गणित शिकवतात आणि 2024 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएममध्ये सामील झाले. स्थानिक एआयएमआयएम नेते आणि शिक्षक अतिक खान म्हणाले की विजय सरांचा धर्म महत्त्वाचा नाही. ते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्यापासून प्रेरित आहेत आणि भारतीय संविधानाबद्दलचे त्यांचे ज्ञान आणि त्यांच्या वर्तनाने ते प्रभावित आहेत. प्रभाग 140 दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला आहे. एका मतदारसंघाचे नेतृत्व समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि दुसऱ्या मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक करत आहेत. मतदार दोन्ही पक्षांवर नाराज होते आणि त्यांना तिसरा पर्याय हवा होता, त्यांच्या स्थानिक समस्या समजून घेणारा. म्हणून विजय सर जिंकले.
आणखी वाचा
Comments are closed.