बाबू गेनू इमारत दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्याचे अर्धे निवृत्तीवेतन कापणार, स्थायी समिती बैठकीत होणार शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डॉकयार्ड रोडजवळ 2013 मध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या पालिका अधिकाऱ्याच्या मूळ निवृत्तीवेतनात अर्धी कपात करण्यात येणार आहे. 13 वर्षांनंतर या दुर्घटनेच्या तपासणीत पालिकेच्या इमारत परिरक्षण विभागातील अधिकारी दोषी ठरले आहेत. ते आता निवृत्तदेखील झाले आहेत. तरीदेखील दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निवृत्तीवेतनातील कपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला असून या ठिकाणी पालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

डॉकयार्ड रोड येथील तळ अधिक चार मजली बाबू गेनू इमारत 27 सप्टेंबर 2013 रोजी कोसळली होती. या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीयांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर केलेल्या चौकशीत पालिकेच्या इमारत परिरक्षण विभागातील उपप्रमुख अभियंता विवेक सागवेकर यांना जबाबदार धरण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध खात्यांतर्गत सर्वंकष चौकशी करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी 7 ऑक्टोबर 2014 अन्वये आदेश पारित केले आहेत.

आठ वर्षांपर्यंत निवृत्तीवेतन कापणार

विलास सागवेकर यांच्या विरोधात बजावण्यात आलेल्या दोषारोपातील आरोप क्र. 1 अंशतः आणि आरोप क्र. 2 पूर्णतः सिद्ध झाल्याने ‘त्यांचे मूळ निवृत्तीवेतन दरमहा 50 टक्के दराने आठ वर्षांकरिता  कमी करण्यात यावे’ ही शिक्षा करण्यात यावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार आता त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनातून दरमहा 50 टक्के दराने कपात करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

Comments are closed.