मुंबईत 23 ठिकाणी मतमोजणी, आज 10 हजार 231 केंद्रांवर मतदान

मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी उद्या गुरुवार, 15 जानेवारी रोजी मतदान होत असून शुक्रवार, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदानासाठी पालिकेकडून 10 हजार 231 केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये पालिकेने 64 हजार 375 कर्मचारी-अधिकारी इलेक्शन डय़ुटीवर तैनात केले आहेत. तर मतमोजणीसाठी 23 केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.
पालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. शिवाय कर्मचाऱयांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. तर 16 जानेवारी रोजी होणाऱया मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अंतर्गत स्ट्राँग रूम आणि मतमोजणी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस खात्याकडून आवश्यक ती मान्यता घेण्यात आली आहे. शिवाय मतदानासाठी आवश्यक असणारी मतपेटी व निवडणूक साहित्य वाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणी होणाऱ्या 23 सेंटरवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे.

Comments are closed.